Wednesday, February 25, 2009

वीणा सहस्त्रबुद्धे यांचा सत्कार

ग्वाल्हेर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका वीणा सहस्त्रबुद्धे यांच्या षष्ठी निमित्त त्यांचा शिष्यपरिवार तर्फे २५ फेब्रुवारी ला विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
- वीणाताइंचा सत्कार - हस्ते दाजिकाका गाडगीळ आणि पं. शरद साठे

- गायन : श्री विजय सरदेशमुख - साथ: डॉ. अरविंद थत्ते (संवादिनी), संजय देशपांडे (तबला)
[Vijaydada.JPG]
- तबला एकलवादन - पं. सुरेश तळवलकर - साथ - सत्यजित तळवलकर, तन्मय देवचके, आदित्य
खांडवे, सावनी तळवलकर, ओंकार दळवी


स्थळ: यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरुड
२५ फेब्रुवारी , सायंकाळी ६:००

Monday, February 23, 2009

Report on 3rd day of Abhisheki Sammelan

Report form Sakal

हस्तमुद्रा आणि अभिनयाचा मिलाफ असलेले नृत्य आणि बहारदार गायनाने रसिक रविवारी मंत्रमुग्ध झाले. "स्वरप्रतिभा' या पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या सांगीतिक कारकिर्दीचा वेध घेणाऱ्या कार्यक्रमाने "पं. जितेंद्र अभिषेकी महोत्सवा'चा समारोप झाला.

तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान, आपला परिसर ट्रस्ट आणि नगरसेवक उज्ज्वल केसकर यांच्यातर्फे आयोजित "पं. जितेंद्र अभिषेकी महोत्सवा'त पंडिता शुभदा यांचे ओडिसी नृत्य आणि पं. जसराज यांचे शिष्य रतन मोहन शर्मा यांचे गायन झाले. "सकाळ' या महोत्सवाचा माध्यम प्रायोजक होता.

आदि शंकराचार्यविरचित "शिवपंचाक्षर स्तुती'ने शुभदा यांच्या कार्यक्रमाची सुरवात झाली. त्यानंतर गुरू केलुचरण महापात्ररचित "सावेरी' रागातील "पल्लवी' ही रचना त्यांनी सादर केली. कळी उमलून फूल होण्याची प्रक्रिया त्यांच्या नृत्यातून साकारली. "जटायू मोक्ष' या तुलसी रामायणावर आधारित रचनेतून त्यांनी हस्तमुद्रा आणि अभिनयाद्वारे कथा उलगडली. त्यांना विजय तांबे यांनी बासरीची, कौशिक बसू यांनी पखवाजची, अलका गुर्जर यांनी सतारची, अग्निमित्र बेहरे यांनी व्हायोलिनची; तर एस. ऋषी यांनी गायनाची साथ केली. या वेळी विद्याताई अभिषेकी यांच्या हस्ते ज्येष्ठ तबलावादक चंद्रकांत कामत यांचा अमृतमहोत्सवानिमित्त आणि नाट्य संमेलनाध्यक्ष रामदास कामत यांचा सत्कार करण्यात आला.

मेवाती घराण्याचे युवा गायक रतन मोहन शर्मा यांनी "पूरिया' आणि "मेघ' हे राग सादर केले. त्यांना उदय कुलकर्णी यांनी हार्मोनिअमची, अजिंक्‍य जोशी यांनी तबल्याची, गोविंद भिलारे यांनी पखवाजची साथ केली; तर सुरेश पत्की यांनी स्वरसाथ केली. "अबीर गुलाल उधळीत रंग' हा पं. अभिषेकी यांनी लोकप्रिय केलेला अभंग त्यांनी गायिला तेव्हा रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.



"स्वरानंद'निर्मित "स्वरप्रतिभा' या दृक्‌श्राव्य कार्यक्रमातून पं. अभिषेकी यांची सांगीतिक कारकीर्द उलगडली. कामत यांच्यासह सुमेधा देसाई, अभिषेकी यांचे पुत्र शौनक अभिषेकी आणि शिष्य हेमंत पेंडसे यांनी सोळा रागांचा समावेश असलेली "रागमाला', "कितक दिन', "हरिभजनावीण काळ घालवू नको रे', "गर्द सभोवती', "सुरत पिया', "हे सुरांनो चंद्र व्हा', "माझे जीवनगाणे' ही गीते सादर केली. ज्योत्स्ना भोळे, पं. प्रभाकर कारेकर, वसंत कानेटकर, प्रभाकर पणशीकर, फय्याज, प्रसाद सावकार, मंगेश पाडगावकर या मान्यवरांची अभिषेकी यांची वैशिष्ट्ये सांगणारी मनोगते पडद्यावर दाखविण्यात आली. या कार्यक्रमाचे संहितालेखन शैला मुकुंद यांचे, तर निवेदन वंदना खांडेकर यांचे होते. अभिषेकी यांच्या स्वरातील "सर्वात्मका' या ध्वनिमुद्रित भैरवीने महोत्सवाची सांगता झाली.

Sunday, February 22, 2009

Report on 2nd day of Abhisheki Sammelan, Pune

Shri. Sameer Dublay
Sath: Charudatta Phadake ( Tabla) Uday Kulkarni ( Harmonium) Govind Khilare ( Pakhawaj)



1) Maarva
a) are jag baaware
b) ho guniyan mil
c) aiso tum jhatki baiyya


2) Natyagit - chedun gele madhur swar wimal

3) Abhang - aadhi rachili pandari

--------------
Shri. Rupak Kulkarni (baruri) and Shri. Abhijit Pohankar (key board) jugalbandi
Accompanist: Shri. satyajit Talwalkar (tabla)

Jinjoti

---------------

Sou. Ashwini Bhide-Deshpande

Accompanist: Sudhir Nayak ( Harmonium) Ajinkya Joshi (Tabla)



1) Rageshri
a) aaj ki rain
b) na jao sawariya

2) Paraj
pawan chalat

3) Hori
rang rasiyo khele faag

Saturday, February 21, 2009

Report on 1st day of Abhisheki Sammelan

Report on 1st day of Abhisheki Sammelan






गायन, वादन आणि नृत्याचा अनोखा मिलाफ असलेल्या "स्वर तालयात्रा' या कलाविष्काराने रसिक शुक्रवारी मंत्रमुग्ध झाले. सहवादन आणि जुगलबंदीच्या माध्यमातून स्वर, ताल, लय आणि नादाची अनुभूती देणाऱ्या कार्यक्रमाने "पं. जितेंद्र अभिषेकी महोत्सवा'स सुरवात झाली.

तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान, आपला परिसर ट्रस्ट आणि नगरसेवक उज्ज्वल केसकर यांच्यातर्फे आयोजित "पं. जितेंद्र अभिषेकी महोत्सवा'चे उद्‌घाटन ज्येष्ठ तबलावादक तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्या हस्ते झाले. विद्याताई अभिषेकी, आमदार गिरीश बापट, नगरसेवक अनिल शिरोळे, भरत वैरागे, गणेश बिडकर, मनीष साळुंके आणि योगेश गोगावले या वेळी उपस्थित होते. 'सकाळ' या महोत्सवाचा माध्यम प्रायोजक आहे.

पं. तळवलकर यांनी या कार्यक्रमामागची संकल्पना सांगितली. ते म्हणाले, "गायन, वादन आणि नृत्य यातून केवळ संगीताचा आविष्कार होतो. पंरपरेमध्ये नवतेची मूल्ये सामावली आहेत आणि नवतेला परंपरेचा साज असतो.'' या कार्यक्रमात त्यांच्यासह सत्यजित तळवलकर, चारुदत्त फडके (तबला), ओंकार दळवी (पखवाज), श्रीधर पार्थसारथी (मृदंग), तन्मय देवचक्के (हार्मोनिअम), रवी चारी (सतार), अनय गाडगीळ (सिंथेसायझर), संदीप कुलकर्णी (बासरी) यांचा सहभाग होता. शौनक अभिषेकी आणि रघुनंदन पणशीकर यांच्या गायन साथीने कार्यक्रमात रंग भरला. शांभवी वझे, परिमल फडके, कावेरी आगाशे, मुक्ती श्री आणि शीतल कोलवालकर यांनी नृत्याचे सादरीकरण केले. इशान कौशल, सावनी तळवलकर आणि मयंक बेडेकर यांनी पढंत गायनाची साथ केली.

'महादेव शंकर' या शिववंदना बंदिशीने कार्यक्रमाची सुरवात झाली. त्यानंतर राग 'सोहनी'ची "चलो हटो पियॉं' ही आडा चौतालाची रचना सादर करण्यात आली. स्वर, ताल आणि भरतनाट्यम-कथक नृत्य यांच्या जुगलबंदीने रसिक मंत्रमुग्ध झाले. राधा-कृष्ण स्तुतीपर रचना आणि "ललत' रागातील तराणा सादर झाला. उत्तरार्धात तळवलकर यांनी विविध मात्रांचे लालित्यपूर्ण सादरीकरण केले. ज्येष्ठ नृत्यांगना सुचेता भिडे-चापेकर यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला.

Shaniwar Wada Festival

http://www.premjoshua.com/images/concert_pune.jpg

The eighth edition of the Shaniwar Wada Festival will commence on the 21st of February 2009 in the city. This year’s festival is a tribute to the late danseuse Rohini Bhate who passed away last year.

21st Feb

The festival will open with a dance performance by her students, who will be performing her favourite compositions, followed by performances by Rohini Bhate school and Shama Bhate schools. The first day will close with a debut dance performance by Barkha Sharma, wife of Rahul Sharma. She will perform the ‘Ganesh Vandana’ in Mohoniattam style. Rahul Sharma will also perform a santoor recital.

22nd Feb

On the second day of the festival, Shobhana Chandrakumar will perform the dance ballet ‘Maya Raavan’. Shobhana Chandrakumar is a National award winning Bharatnatyam dancer. The ‘Maya Raavan’ has already made waves in Mumbai when it was performed there and now it comes to Pune on request.

Venue: Shaniwar Wada, Shaniwar Peth

Date: 21st and 22nd February 2009

Friday, February 20, 2009

पं. जितेंद्र अभिषेकी महोत्सव २००९ , पुणे


"आपला परिवार ट्रस्ट" आणि "तरंगिणी सांस्कृतिक प्रतिष्ठान" आयोजित
पं. जितेंद्र अभिषेकी महोत्सव २००९ , पुणे


दिनांक २०, २१ आणि २२ फेब्रुवारी
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरुड



२० फेब्रुवारी सायं. ६:३०
- पं. सुरेश तळवलकर प्रस्तुत - स्वर तालयात्रा
कलाकार: सत्यजित तळवलकर, चारुदत्त फडके, श्रीधर पार्थोसारथी, रविन्द्र चारी, संदीप कुलकर्णी, ओंकार दळवी, अमेय गाडगीळ, रघुनन्दन पणशिकर, तन्मय देवचके, कावेरी, मुक्ति, शीतल, शाम्भवी, सावनी, इशान, मयंक

http://kennedy.byu.edu/events/enews/images/taal-yatra.JPG

शनिवार २१ फेब्रुवारी सायं. ५:३०
(1)
श्री. समीर दुबळे - गायन ( पं. जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य)
साथ संगत: चारुदत्त फडके (तबला) , उदय कुलकर्णी (संवादिनी)


(2)
जुगलबंदी: अभिजित पोहनकर ( कीबोर्ड) आणि रूपक कुलकर्णी ( बासरी )
साथ संगत: सत्यजित तळवलकर

(3)
सौ. अश्विनी भिडे - देशपांडे - गायन
साथ संगत: मंगेश मुळे ( तबला), सुधीर नायक ( संवादिनी)


रविवार २२ फेब्रुवारी सायं. ५:३०
(1)
- पं. रतन मोहन शर्मा - गायन ( पं. जसराज यांचे शिष्य)
साथ संगत: अजिंक्य जोशी (तबला) , उदय कुलकर्णी (संवादिनी)


(2)
- नृत्य : पंडिता शुभदा

(3)
- "स्वरानंद" निर्मित - स्वरप्रतिभा - पं. जितेंद्र अभिषेकी यांचा सांगीतिक कराकिर्दिचा द्रुक-श्राव्य वेध
कलाकार: पं. रामदास कामत, श्री. हेमंत पेंडसे, सौ. सुमेधा कुलकर्णी
साथ संगत: मंगेश मुळे (तबला) , उदय कुलकर्णी (संवादिनी)

Monday, February 16, 2009

Pictures taken during Pt. Jitendra Abhisheki Sangeet Sammelan, Ujjain

Pictures taken during Pt. Jitendra Abhisheki Sangeet Sammelan in Kalidas Sanskrit Akadami, Ujjain, MP on 14th and 15th February.














































14th Feb
Shri. Sameer Dublay ( yaman, din ki puriya, natyageet)
Shri. Madhup Mudgal (nayaki kanada, kamodavanti, shanana tarana, thumri in khamaj, bhairavi)

15th Feb
Shri. Shounak Abhisheki ( bilaskhani todi, shuddha sarang, natyagit)


Small clips from the sammelan:

Saturday, February 14, 2009

गांधर्व महाविद्यालय, पुणे आयोजित १० वा "विविद" स्मृति संगीत समारोह

भारतीय संगीत प्रसारक मंडळाचे
गांधर्व महाविद्यालय, पुणे आयोजित
१० वा "विविद" स्मृति संगीत समारोह

शनिवार १४ फेब. २००९ सायं. ६
- श्री. कुमार मरडूर (गायन)
- पं. विश्वमोहन भट (मोहन वीणा)

रविवार १५ फेब. सकाळी ९


- श्री. रघुनन्दन पणशीकर (गायन)
- श्री. केशव तळेगावकर (गायन)
- विदुषी श्रीमती एन. राजम (व्हायोलिन)

रविवार १५ फेब. सायं. ५


- सौ. मंजुषा कुलकर्णी-पाटिल (गायन)
- पं. उल्हास कशाळकर (गायन)

स्थळ: आबासाहेब गरवारे महाविद्यालय सभागृह , कर्वे रोड, पुणे


------------------------------------------------------
देणगी प्रवेशिका: (तिन्ही सत्रांसाठी )
* रु. १००० (आरक्षित खुर्ची)
* रु २५० (आरक्षित खुर्ची)
* रु १५० ( अनारक्षित खुर्ची)
* रु. १०० ( भारतीय बैठक)

प्रवेशिका:
* गांधर्व महाविद्यालय, शनिवार पेठ २४४५०७९५
* नावडीकर म्युझिकल, कोथरुड \ टिळक रोड
* शिरीष ट्रेडर्स, कमला नेहेरू पार्क

Friday, February 13, 2009

तबला महोत्सव

कै. पंडित जी. एल. सामंत यांचा स्मृति निमित्त आयोजित कार्यक्रम

कलाकार:
निखिल फाटक
समीर पुणताम्बेकर
आदित्य कल्याणपुर
मुकेश जाधव
अनुव्रत चटर्जी
सत्यजित तळवलकर
अनीष प्रधान
शुभंकर बनर्जी
योगेश समसी



दि. १३, १४, १५ फेब. २००९
सायं. ५:३०
भरत नाट्य मंदिर


संपर्क: निखिल फाटक ९८८१२ ३५७४०
टिकिट विक्री: नावडीकर म्युझिकल, टिळक रोड \ कोथरुड

Thursday, February 12, 2009

Viennese Influences

Time: Thu, 12th Feb 2009, 7 p.m.
Venue: Mazda Hall
Organized by: Poona Music Society (their website poonamusicsociety dot com)

"Thomas Schrott, Violin Daniel Bosshard, Piano

In a programme of:

Andante E major K.261 for violin and piano (Wolfgang Amadeus Mozart)
Rondo C major K.373 For violin and piano

Sonata for violin and piano No.1 d minor op.33 (Robert Gund)

Various Pieces (Fritz Kreisler)

Thomas Schrott, played extensively in Italy for the most important concert societies such as: Teatro alla Scala di Milano, the Theaters of Bologna, Mantova, Genova, Torino and Rome, the Festivals of Ravello, Portogruaro and Mittelfest. Furthermore, he has performed concerts at the London Barbican and Royal Albert Hall and the Berlin Philharmonic (small hall) in North and South America, Japan, South Africa, India, Bahrain, Mauritius, Turkey, Montenegro, Cuba and Uzbekistan.

As a soloist, he performed with the Moldova Symphony Orchestra (Beethoven Concerto), Orchestra della Sagra Musicale Umbra (cond. Thomas Briccetti), Festival Strings Lucerne (cond. Rudolf Baumgartner), Bombay Chamber Orchestra (cond. Wolfgang Harrer, Vienna).

Daniel Bosshard studied with Hans Andreae at the Zurich Conservatory as well as with Rolf Mäser (piano) and Robert Suter (composition) at the Music Academy of Basel. Besides teaching piano at the teacher’s training faculty of the University of Zurich he was for 10 years member (harpsichord) and soloist of the “Festival Strings Lucerne” (conductor: Rudolf Baumgartner). As a pianist and harpsichordist he has toured in Switzerland, Germany, France, Finland, Italy, Austria, Japan and South Africa. With violonist Thomas Schrott he has played several times in India and Bahrain."


Monday, February 9, 2009

A Tribute to the Ticklers

"From the speakeasys of New Orleans to modern day New York, jazz and its' pianists have had a colorful history.
New Yorker Richard Bennett will play vivid selections ranging from ragtime to bebop to blues illustrating the differences between the music of various eras. He will also play original compositions that convey the present and future of the music drawing on rhythms from all around the world. It is guaranteed to be a fun, swinging and enlightening programme."

Time: Mon, 9th Feb 2009. 7 p.m.
Venue: Mazda Hall
Organizers: Poona Music Society (The have their own website poonamusicsociety dot com)

Sunday, February 8, 2009

CONCERT: Suprit Deshpande (Tabla solo); Ronu Mujumdar (Bansuri)

Pt. Sadashiv Deshpande Memorial Concert -

Suprit Deshpande (Tabla solo)
Ajay Joglekar (Harmonium nagma)

Ronu Mujumdar (Bansuri)
Satyajit Talwalkar (Tabla)


Tilak Smarak Mandir on 8th February, 9:00PM

Saturday, February 7, 2009

CONCERT: Jugalbandhi of the Sitar and Jaltarang

A unique concert of Duet (Jugalbandhi) of the instruments Sitar and Jaltarang will be held live in Pune on 7th February 2009

* Sitar by Sameep Kulkarni
* Jaltarang by Milind Tulankar
* Tabla by Ganesh Tanawade

Date: 7th February 2009
Time: 6.30 p.m. onwards
Venue:
Aperture India Art Gallery,
Terrace of Millenium Plaza Mall,
Opposite to the fergusson College Main Gate,
Fergusson College Road, Pune

उस्ताद अल्लारखा पुण्यस्मरण

'सा' व 'नि' सुर संगीत आयोजित
उस्ताद अल्लारखा पुण्यस्मरण


शनिवार दिनांक ७ फेब, सायं. ५:३०
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह

- उस्ताद अल्लारखा यांचा वर माहिती पट
- "ताल कीर्तन" पं. सुरेश तळवलकर यांचा शिष्यांचा आविष्कार
- कौशिकी चक्रवर्ती - शास्त्रीय गायन, ठुमरी
- श्री. योगेश समसी - तबला सोलो



प्रवेश विनामूल्य


----------------------------------------------------------------------------

News from Esakal on this:
पुणे, ता. १ - ज्येष्ठ तबलावादक उस्ताद अल्लारखॉं यांच्या स्मृतिदिनानिमित्त येत्या शनिवारी (ता. ७) "सा' व "नी' सूरसंगीत संस्थेतर्फे संगीत मैफल आयोजिण्यात आली आहे.

ज्येष्ठ तबलावादक पं. सुरेश तळवलकर यांच्या शिष्यांचे "तालकीर्तन', कौशिकी चक्रवर्ती यांचे शास्त्रीय गायन; तसेच अल्लारखॉं यांचे शिष्य योगेश समसी यांचे तबलावादन आदी कार्यक्रम होणार आहेत."सकाळ' या कार्यक्रमाचा माध्यम प्रायोजक आहे.

यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे सायंकाळी साडेपाच वाजता ही मैफल होणार आहे. सुरवातीला "तालकीर्तन' होईल. त्यानंतर "फिल्म्स डिव्हिजन'निर्मित अल्लारखॉं यांच्यावरील लघुपट दाखविण्यात येणार आहे. "अल्लारखॉं यांचे तबल्यातील योगदान' या विषयावर तळवलकर श्रोत्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर कौशिकी चक्रवर्ती यांचे गायन होईल. त्यानंतर योगेश समसी यांच्या एकल (सोलो) तबलावादनाने या मैफलीची सांगता होणार आहे.

"सा' व "नी' सूरसंगीत संस्थेचे सुरेंद्र मोहिते म्हणाले, ""अल्लारखॉं यांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी पुण्यातील तबलावादक आणि सर्व कलाकारांतर्फे कार्यक्रम व्हावा, अशी आमची इच्छा होती. संगीतावर विलक्षण प्रेम करणाऱ्या अल्लारखॉंनी ए. कुरेशी या नावाने 25 चित्रपटांना संगीत दिले, म्हणूनच या कार्यक्रमात तबल्याबरोबरच गायनाचाही समावेश केला आहे. या कार्यक्रमाला प्रवेश विनामूल्य असून, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे शनिवारी सकाळी साडेनऊपासून "एका व्यक्तीस दोन' याप्रमाणे प्रवेशिका देण्यात येतील.

Friday, February 6, 2009

Baajaa Gaajaa 2009

Baajaa Gaajaa is a unique three-day event dedicated to Indian music in all its diversity and richness. Scheduled to take place at Ishanya, Pune (India) from the 6th to the 8th of February, 2009, it will bring together musicians, music lovers, scholars, instrument makers, indie record labels, publishers and a host of organizations and individuals connected with music and music making in 21st century India.

For more details, please have a look at their website. http://www.baajaagaajaa.com/

Date Time Activity Participants Venue
Friday
Feb 6, '09
10 am to 11 am Inauguration Opening remarks by Dr. Ashok Da. Ranade. Seminar Hall
10 am to 8 pm Exhibition and sale of CDs, DVDs, books, and merchandise pertaining to music Producers, artistes, publishers, manufacturers, craftsmen, and others Kunj and Aangan
10 am to 8 pm Archival photo exhibition
Tilting Art Gallery
11 am to 1 pm Towards a ‘Sound’ Future – Seminar on insurance and financial strategies for musicians, craftspeople and other agencies involved in music from India Expert panel consisting of investment experts and representatives of insurance companies Seminar Hall
2 pm to 4 pm Bishar Blues - Film Screening Director: Amitabh Chakraborty Seminar Hall
4.30 pm to 6 pm Live music and dialogue with performers Artistes to be announced shortly Seminar Hall
7 pm to 9.30 pm 1871 in 2009: The Parsi Gayan Uttejak Mandali - Concert Vocalists: Manjusha Kulkarni Patil, Anuradha Kuber, Prachi Dublay, Shaunak Abhisheki, Bireshwar Gautam, Uday Bhawalkar; Hamonium: Sudhir Nayak and Suyog Kundalkar; Tabla: Bharat Kamat and Prashant Pandav; Pakhawaj: Manik Munde Amphitheatre
Saturday
Feb 7, '09
10 am to 8 pm Exhibition and sale of CDs, DVDs, books, and merchandise pertaining to music Producers, artistes, publishers, manufacturers, craftsmen, and others Kunj and Aangan
10 am to 8 pm Archival photo exhibition
Tilting Art Gallery
11 am to 1 pm Whose Music is it? – Seminar on Intellectual Property Rights Presided over by The Hon’ble Mr. Justice S.J. Vazifdar; Expert panelists: Professor T.N. Daruwala and Advocate Chander Lall Seminar Hall
2 pm to 4 pm Leaving Home - Film screening Director: Jaideep Verma; Indian Ocean band represented by Rahul Ram Seminar Hall
4.30 pm to 6 pm Live music and dialogue with performers Artistes to be announced shortly Seminar Hall
7 pm to 9.30 pm Spin-n-Scratch - Concert DJ Gaurav Issar; Other artistes to be announced shortly Amphitheatre

Sunday
Feb 8, '09

10 am to 8 pm Exhibition and sale of CDs, DVDs, books, and merchandise pertaining to music Producers, artistes, publishers, manufacturers, craftsmen, and others Kunj and Aangan
10 am to 8 pm Archival photo exhibition
Tilting Art Gallery
11 am to 1 pm Let’s Talk Experimentation – Seminar on experimentation in contemporary music Overview by Dr. Ashok Da. Ranade. Panel of artistes to be announced shortly Seminar Hall
2 pm to 4 pm Laya - Film screening Producer: Sonya Mazumdar Seminar Hall
4 pm to 6 pm Music Matters - Discussion on issues related to current performance and recording situation Open House Seminar Hall
7 pm to 9.30 pm Maestro’s Muse - Concert Maestros Shivkumar Sharma (santoor) and Dr. M. Balamuralikrishna (vocal) Amphitheatre

Wednesday, February 4, 2009

CONCERT: श्री. जयतीर्थ मेवुंडी , श्री. आनंद भाटे

भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचा वाढदिवसानिमित्त किराणा घराण्याचा दोन प्रथित यश गायकांची विशेष मैफल
श्री. जयतीर्थ मेवुंडी



श्री. आनंद भाटे


बुध. दि. ४ फेब. सायं. ५:३०
टिळक स्मारक मंदिर , पुणे
तबला: श्री. भरत कामत , संवादिनी: श्री. राहुल गोळे

Sunday, February 1, 2009

CONCERT: देवकी पंडित

"नाते शब्द सुरांचे"
देवकी पंडित यांची शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायनाची मैफल
साथसंगत : तबला: केदार पंडित , संवादिनी : कुमार करंदीकर, बासरी : अमर ओक

१ फेब. रविवार सायं. ५ , टिळक स्मारक मंदिर


Shrimati Devaki Pandit is a maharashtrian performer of classical, semi-classical, light and devotional music India.

She received her initial music training from her mother Smt. Usha Pandit. She then trained under Vasantrao Kulkarni, Kishori Amonkar, Jitendra Abhisheki. Devakitai is currently receiving instruction from Babanrao Haldankar. In light music, she counts poet-composer Sudhir Moghe among her gurus.

She started performing at the age of nine and did her first recording at the age of twelve, but came into the limelight when she was given a break by Hridaynath Mangeshkar in a programme on doordarshan. A highly talented singer, she has not only given performances in India, but has undertaken concert tours all over the world at the invitation of prestigious institutions. She has also sung for various films, with renowned music directors. However, her focus remains on Hindustani classical music.